Imd havaman andaj ; पाऊस घेनार विश्रांती, किती दिवसासाठी पावसाची उघाड..

Imd havaman andaj ; पाऊस घेनार विश्रांती, किती दिवसासाठी पावसाची उघाड..

 

राज्यात मुसळधार बरसत असलेला पाऊस आता ओसरणार आहे. आज संपूर्ण मराठवाडा तसेच मध्य महाराष्ट्रातील काही भागात तर उद्या संपूर्ण विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील पावसाचा जोर कमी होणार आहे.

 

पाऊस घेनार विश्रांती

 

उद्या 21 ऑगस्ट पासून राज्यातील पाऊस विश्रांती घेणार असून, पूर्व विदर्भ आणि कोकणात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होत राहील. राज्यातील इतर भागात (२१ ते २४) हलक्या पावसाची शक्यता राहील असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

 

Imd havaman andaj आज कोनत्या जिल्हात पावसाची विश्रांती

 

आज मराठवाड्यातील संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, बीड, धाराशिव तसेच उत्तर महाराष्ट्रातील जळगाव आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील सोलापूर, सांगली या भागातील पाऊस कमी होणार आहे. या जिल्ह्यात फक्त तुरळ ठिकाणीच हलका पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलाय.

 

Imd havaman andaj ; आज या जिल्ह्यात पाऊस

 

विदर्भ ; विदर्भातील अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या सर्व जिल्ह्यात हलक्या ते मध्यम पावसाचा येल्लो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

 

तर मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, तसेच घाटमाथा भागात मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा आँरेंज/रेड अलर्ट देण्यात आला आहे.

 

नाशिक, अहिल्यानगर, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यातही जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने जारी केला आहे.

 

उद्या 21 ऑगस्ट पासून पाऊस विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र तसेच दक्षिण मध्य महाराष्ट्रात उघडीप देणार आहे. तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता कायम राहील असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. तर कोकणात जोरदार पावसाची शक्यता कायम आहे. Imd

Leave a Comment